शालिनी ठाकरेंच्या प्रयत्नांना यश; आखाती देशांमध्ये अडकलेले महाराष्ट्रीय नागरिक लवकरच राज्यात परतणार

Raj Thackeray- Shalini Thackeray

मुंबई :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देश लॉकडाऊन आहेत. भारतही दोन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे अचानक आलेल्या या संकटात अनेकांना आहे तेथेच थांबावे लागले आहे. तर, परिस्थितीचा अंदाज घेऊन अनेकांना परदेशातून भारतात आणलेही आहे. त्याचप्रमाणे, आखाती देशामध्ये काही महाराष्ट्रीय नागरिक अडकून होते. त्यांना राज्यात आणण्याकरिता मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आखाती देशात अडकलेल्या मराठी लोकांना राज्यात आणण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता.

त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. “पुढील सात  दिवसांत दोहा येथून खाडीत अडकलेल्या भारतीयांना परत आणले जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केलं आहे.” असे शालिनी ठाकरेंनी सांगितले.

आखाती देशांमध्ये (Gulf Countries) अडकून पडलेल्या महाराष्ट्र बंधू-भगिनींना महाराष्ट्र परत आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि नागरी उड्डाण मंत्रालय यांच्याशी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.

मनसेच्या मागणीला गांभीर्याने घेऊन योग्य निर्णय घेतल्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार- अशी पोस्ट करून शालिनी ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER