३१ डिसेंबरला संचारबंदीची अट शिथिल करा, नववर्षाच्या स्वागताला मनसे रस्त्यावर

MNS1

मुंबई : नविन वर्षाच्या स्वागत (Happy New Year) जल्लोषात व्हावे आणि तरुणांना याचा आनंद घेता, यावा यासाठी सरकारने लादलेल्या संचारबंदीच्या अटी ३१ डिसेंबर दिवशी तरी शिथिल कराव्यात अशी मागणी मनसेने (MNS) केली आहे. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत आणि नवीन वर्षाच्या स्वागत जोषात करणार आहोत, असे इशाराच मनसेने सरकारला दिला आहे.

अनेक तरुण मंडळी तसेच हौशी लोक मनसेकडे नववर्षासाठी अटी शिथिल करण्याची मागणी या चार पाच दिवसांपासून करीत आहे ही मागणी लक्षात घेता तसेच वर्षभर सण उत्सव हे निर्बंधातच गेल्याने एका दिवसापुरती हा निर्बंध उठवावे अशी मागणी मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे.

दरम्यान राज्यात २२ डिसेंबर महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी ५ जानेवारीपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER