शेकडो गुन्हे दाखल केले तरी… मनसेने घोषित केली सामाजिक बांधिलकी

नवी मुंबई : वाशीच्या टोलनाक्यावर (Vashi toll naka case) झालेल्या तोडफोड प्रकरणी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे वाशी न्यायालयात सुनावणीसाठी हजर झालेत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांना जामीन मंजूर झाला. त्यानंतर मनसेने ट्विट करून सरकारला इशारा दिला – शेकडो गुन्हे दाखल केले गेले तरी ज्वलंत विचार आणि बुलंद आवाज रयतेच्या न्याय-हक्कांसाठी घुमणारच !
घटना
२६ जानेवारी २०१४ टोलवसुलीच्या मुद्यांवरून वाशी टोलनाक्याची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी राज ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. राज ठाकरेंच्या प्रक्षोभक भाषणामुळे ही तोडफोड झाल्याचा आरोप पोलिसांनी केला. याआधी २०१८ आणि २०२० सालीही न्यायालयाने राज ठाकरेंना वाशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते; पण ते हजर न राहिल्यामुळे त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला होता. आज ते न्यायालयात हजर झालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER