मनसेचा निर्धार : २४ तारखेला ऊर्जामंत्र्यांचा २१ फुटांचा पुतळा जाळणार

raj Thackeray & Nitin raut

नागपूर : वीज बिल माफीचा सोमवारपर्यंत निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरून मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. या आंदोलनाची पहिली ठिणगी विदर्भातून पडणार आहे. २४ नोव्हेंबर रोजी मंगळवारी विदर्भात वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.

यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांचा २१ फुटांचा पुतळा जाळण्याचा इशारा मनसेने दिला आहे. वीज बिल माफीच्या मुद्द्यावर आंदोलन करण्याचा निर्णय झाल्यानंतर विदर्भातील मनसे कार्यकर्त्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. विदर्भातील हिंगणघाट शहरात मनसेकडून मंगळवारी मोठं आंदोलन करण्यात येणार आहे.

मनसे नेते अतुल वादिले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून यावेळी ऊर्जामंत्र्याचा २१ फुटांचा पुतळा जाळून रोष व्यक्त करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरकारचा निषेधही नोंदवण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER