जनतेने तुम्हाला आभासी मुख्यमंत्री मानले तर… मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका

raj thackeray and uddhav thackeray

मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. निवडणुकीपूर्वी प्रत्यक्ष बांधावर जाणारे उद्धव ठाकरे आता आभासी पद्धतीने बांधावर जात आहेत. उद्या जनतेनेही तुम्हाला प्रत्यक्ष मुख्यमंत्री न मानता आभासी मुख्यमंत्री मानलं तर, अशी खरमरीत टीका देशपांडे यांनी केली.

शेतकऱ्यांना वाटतंय की कुणी तरी आपल्याला दिलासा द्यायला हवा… बरं राज्यातले सगळे नेते फिरत आहेत. सरकारमधले मंत्री फिरत आहेत. मग मुख्यमंत्र्यांनी जायला नको का, असा सवालही देशपांडे यांनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER