… जनतेलाही भिकारी बनवायचे चाळे सुरू आहेत, मनसेची संचारबंदीवर टीका

MNS criticizes curfew

मुंबई : करोना (Corona) आणि लॉकडाउनमुळे (Lockdown) राज्यातील जनता, नोकरदार, छोटे मोठे व्यापारी यांची आर्थिक गणित बिघडली आहेत. यावर ठोस उपाययोजना न करता संचारबंदी लागू करण्याचा निर्णय फारसा योग्य नाही. आर्थिक समस्या उद्भवल्यामुळे हे सरकार भिकारी आहेच आणि आता जनतेलाही भिकारी बनवण्याचे चाळे करते आहे, अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) महाविकास आघाडी सरकारवर केली.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणालेत, अमेरिकेप्रमाणे हे सरकार आर्थिक पॅकेज महाराष्ट्रातील जनतेसाठी जाहीर करत नाही, उलट संचारबंदी करून लोकांना त्यांच्या उपजिविकेसाठी कामही करू देत नाही! जनतेने पैसे आणयचे कुठून? सरकार स्वत: भिकारी आणि लोकांना भिकारी बनवायचे चाळे सुरू, अशी टीका त्यांनी केली.

सेलिब्रिटीच्या नाईट पार्टीसमध्ये करोना जात नाही?

रेसकोर्सवर होणाऱ्या पार्ट्यांना करोना जात नाही का? मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मंत्र्यांना दिलेल्या पार्टीत करोना येऊ शकत नव्हता का? माणस पाहून करोना फिरतो का? सेलिब्रिटींना सार माफ आणि नियम केवळ जनतेसाठी अशी या सरकारची भूमिका आहे का? करोना संदर्भातील दुसरा ‘म्युटेड व्हायरस’ ब्रिटनमध्ये सापडला म्हणून संचारबंदी केली. भविष्यात असे तिसरे – चौथे व्हायरस सापडू शकतील म्हणून काय जनतेला कायम लॉकडाउनमध्ये ठेवणार का? असा प्रश्न मनसेने उद्धव ठाकरेंच्या सरकारला विचारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER