मुख्यमंत्री साहेब सरकार इतकं निर्दयी कसं झालं? मनसेकडून उद्धव ठाकरेंना आगळ्यावेगळ्या शुभेच्छा

Raj Thackeray-Shivsena

मुंबई :नववर्षाच्या पहिल्या दिवशी मनसेने वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर  टीकास्त्र सोडले आहे. मनसेने आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्री वाढीव वीज बिलाचं काय झालं? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. या आशयाचे एक बॅनरही मनसेने मातोश्रीबाहेर लावले आहे. या बॅनरमधून मनसेने उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) नववर्षाच्या शुभेच्छा देत, त्यांना वीज बिलाच्या आश्वासनाचीही आठवण करून दिली आहे.

“मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्री महोदय गोड बोलता बोलता नवीन वर्ष आलं. गोड बातमी तर राहिली दूर; पण जनतेचे हालच हाल झाले. जनतेच्या खिशात पैसा नाही तरी वीज बिल भरा, ऊर्जामंत्री म्हणाले. मुख्यमंत्री साहेब सरकार इतकं निर्दयी कसं झालं ?” असा सवाल मनसेने (MNS) या बॅनरमधून विचारला आहे.

“मुख्यमंत्री वाढीव वीज बिलाचे  काय झाले ?” असेही यात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्र्यांना मनसेकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर दुसरीकडे मात्र मागील वर्षात जनतेला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER