…तर ‘तुम्ही’ सगळेच भस्मसात व्हाल! मनसेचा वारीस पठाण यांना इशारा

Raj Thackeray-Waris Pathan

मुंबई :  एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी हिंदू-मुस्लिमांबाबत विवादित विधान केल्याने आता हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. आम्ही १५ कोटी आहोत; पण १०० कोटींवर भारी पडू, असं विधान वारीस पठाण यांनी कर्नाटकातील गुलबर्गा इथं केलं होतं. त्यानंतर सर्वच स्तरांवरून संताप व्यक्त होत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी होऊ लागली. मात्र चिथावणीखोर वक्तव्य करूनही वारीस पठाण यांनी ‘माफी मागण्याचा प्रश्नच नाही’ असं म्हटलं आहे. वारीस पठाण यांच्या या वक्तव्यानंतर मनसेने त्यांना रोखठोक इशारा दिला आहे.

“दगडाचं उत्तर दगडानं, तलवारीचं उत्तर तलवारीनं, हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं आहे, तसंच उत्तर दिलं जाईल.” असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.

वारिस पठाण यांच्या वक्तव्यावरून भाजप आणि मनसे आक्रमक

याशिवाय मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरही ट्विट करून वारीस पठाण यांना थेट इशारा दिला आहे. “आम्ही…’ ‘तुम्ही…’ असले भेद आम्हाला मान्य नाहीत. पण…. ‘आम्ही’ इतके, ‘तुम्ही’ तितके… अशी भाषा करणाऱ्या वाचाळवीरांना ‘आम्ही’ इतकंच सांगतो की जर शिवरायांचा तिसरा नेत्र उघडला तर ‘तुम्ही’ सगळेच भस्मसात व्हाल!”  असं मनसेनं ट्विट केलं आहे.