अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ‘ठग’ ; योगींचे नाव न घेता मनसेची टीका

Raj Thackeray - Yogi Adityanath

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. योगी यांच्या दौऱ्यावर मनसेकडून खरपूस टीका करण्यात येत आहे. ‘अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला “ठग”, अशा शब्दात मनसेने (MNS) योगींवर निशाणा साधला आहे.

उत्तर प्रदेशात निर्माण होणाऱ्या फिल्मसिटीत योगी आदित्यनाथ यांना मुंबईचं वैभव असलेल्या बॉलिवूडला (Bollywood) न्यायचं आहे. त्यांच्या याच कृतीला मनसेने आता होर्डिंगच्या माध्यामातून निशाणा साधला .

कहा राजा भोज…और कहा गंगू तेली….”कुठे महाराष्ट्रचं वैभव”….तर कुठे युपीचं दारिद्र्य…असे मनसेने या बॅनरमध्ये म्हटलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपटसृष्टी, युपीला नेण्याचं मुंगेरीलालचं स्वप्नं. अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला ‘ठग’,” असेही या बॅनरवर लिहिल्या आहेत .

विशेष म्हणजे या बॅनरमध्ये मनसेकडून योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांना युपीचा ठग असे म्हटलं आहे. मुंबई लुटायला आलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा इरादा हा मुंगेरीलालचे स्वप्नं असल्याचंही त्यांनी होर्डिंगमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे गणेश चुक्कल (Ganesh Chukkal) यांनी हेच होर्डिंग भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाबाहेरही लावले , हे विशेष .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER