कोरोनाची लस काय मातोश्रीच्या गच्चीवर बनते का? ग्लोबल टेंडरवरून मनसेची शिवसेनेवर मिस्कील टीका

MNS-Shiv Sena

मुंबई : मुंबई महापालिकेनंतर (Mumbai mahanagarpalika) आता राज्य सरकारनेही पाच कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या खरेदीसाठी ग्लोबल टेंडर (global tender) काढले आहे. केंद्र सरकारने लस आयातीला परवानगी दिल्यानंतर राज्य सरकारने लसींसाठी ग्लोबल टेंडर काढले. लसीकरणाच्या उत्पादनापेक्षा मागणी जास्त आहे. अटीनुसार आधी केंद्राकडून परवानगी घ्या. देशात लस तयार करणाऱ्या कंपन्या १४ आहेत. लसीचे उत्पादन जास्त नसल्यामुळे टेंडर काढण्याचा प्रश्नच नाही.

मुंबई महापालिकेनेदेखील अशा पद्धतीने ग्लोबल टेंडर काढले आहे. परंतु याला अद्याप कोणत्याही कंपन्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने आठवडाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान. ग्लोबल टेंडरला प्रतिसाद न मिळाल्याने मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. महापालिकेच्या लस खरेदीसाठीच्या जागतिक निविदेचा फज्जा उडाला आहे. कारण, यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. यामुळे आदित्य ठाकरेंनी मुंबईचे लसीकरण तीन महिन्यांत पूर्ण करण्याबाबत जी घोषणा केली होती, ती कशाच्या जोरावर केली? असा सवाल उपस्थित होत आहे. महापालिकेच्या लस केंद्रावर लसींची कमी असताना खाजगी लसीकरण केंद्रांवर चढत्या किमतीत लसी कशा उपलब्ध होतात? त्याचबरोबर, “लसी तुला बीएमसीवर भरवसा नाय काय?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.

राज्यात सर्वांत मोठा प्रश्न लसीकरणाचा आहे. संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) म्हणाले की, “लसीकरणाचे राजकारण काय, यातली सर्व वस्तुस्थिती मी सांगतो. सगळी राजकारणे तुम्ही करायची काय. कोरोनाची लस काय मातोश्रीच्या गच्चीवर बनते का? राजकारण शिवसेना करते. मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरेंचे फोटो, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचे लसीकरण केंद्राबाहेरील फोटो लावून लस विकता काय?”

सध्या राज्यात लाॅकडाऊन कायम आहे. सद्यपरिस्थितीत कोरोना रुग्ण कमी आढळत आहेत. याबाबत सरकारला विचार करण्याची आवश्यकता आहे. सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. सरकारला नियम शिथिल करण्याबाबत विचार करण्याची गरज आहे. टास्क फोर्सचे लोक केवळ मुलाखत देऊन जातात. सरकार काम काय करते त्यांना विचारायला पाहिजे, असे मत संदीप देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button