मनसे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील हत्या प्रकरणात मुख्य आरोपीला अटक

MNS Rakesh Patil

मुंबई : अंबरनाथ शहरात मनसेचे (MNS) शहर उपाध्यक्ष राकेश पाटील (MNS Rakesh Patil) यांची भररस्त्यात धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी कडक कारवाई करत मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या असल्याची माहिती आहे .

या हत्या प्रकरणात पोलिसांनी आधीच 4 आरोपींना अटक केली होती. यानंतर आता मुख्य आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी ही कारवाई केली .

माहितीनुसार, आरोपी डी मोहन असं राकेश पाटील हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आज कोर्टात हजर करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या घटनेमुळे अंबरनाथमध्ये मोठी खळबळ उडाली होती. रिलायन्स रेसिडेन्सी परिसरात हा प्रकार घडला होता. संध्याकाळी सुमारास राकेश पाटील हे आर मार्टजवळ उभे होते. त्यावेळी डी मोहन आणि त्याच्या साथीदारांनी राकेश पाटील यांच्यावर हल्ला केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER