“आमचे आजोबा..” म्हणत राज ठाकरेंनी दिला प्रबोधनकारांच्या आठवणींना उजाळा

Raj Thackeray,Prabodhankar thackeray

मुंबई :  संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक असणारे पत्रकार, समाजसुधारक, वक्ते केशव ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar thackeray) यांची आज जयंती. प्रबोधनकरांच्या जयंती निमित्त त्यांचे नातू आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विटवरुन एक फोटो ट्विट करुन त्यांच्या स्मृती विनम्र अभिवादन केले आहे.

‘अन्याय्य रूढी, जाति-व्यवस्था, आणि अस्पृश्यतेच्या विरोधात वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्र वापरून पुराणमतवाद्यांशी लढा देत समाजसुधारणांना पुढे नेणारे द्रष्टे समाजसुधारक, आमचे आजोबा स्व. प्रबोधनकार ठाकरे ह्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं (MNS) विनम्र अभिवादन,’ असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे .

ही बातमी पण वाचा : बसच्या गर्दीत नाही, पण रेल्वेत कोरोना होतो का? मनसेचा ठाकरे सरकारला सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER