राज ठाकरेंचा मास्क न घातल्याचा फटका; भरावा लागला दंड

Raj Thavkeray

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे कडेकोट पालन करण्याचे सरकारने बजावले आहे. मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे अनेकवेळा मास्क परिधान न करताच प्रवास करत असल्याचे समोर आले होते. परंतु यावेळी मास्क न घातल्याचा फटका त्यांना बसला आहे .

राज ठाकरे (Raj Thackeray) कुटुंबासह शुक्रवारी मुंबईहून अलिबागला रवाना झाले होते. यावेळी त्यांनी मुंबई-मांडवा रो-रो फेरीने प्रवास केला. यावेळी रो-रो बोटीत प्रवाशांनी धुमप्रान करु नये आणि मास्क परिधान करावा, अशी षणा केली जात होती. मात्र राज ठाकरे बोटीवरच्या मोकळ्या जागेत मास्क न परिधान करताच उभे होते.

या सर्व प्रकारानंतर बोटीवरील अधिकाऱ्यांनी राज ठाकरेंना नियमांची माहिती दिली. यानंतर आपली चूक लक्षात येताच राज ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न केल्यामुळे राज ठाकरेंनी १००० रुपयांचा दंड देखील भरला, अशी माहिती समोर आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER