
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे. शरद पवार यांना सध्याच्या परिस्थितीनुसार राज ठाकरेंबाबत तुम्ही कसा विचार करता, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) स्वतंत्र आपली मत मांडतात.
तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या तरुणांचा एक वर्ग आहे. निवडणुकीमध्ये त्यांना हवं तसं यश मिळालं नसेल, मात्र याचा अर्थ तरुणांचा राज ठाकरेंबद्दलचा क्रेज गेला आहे, असं मी मानणार नाही, असं शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान १२ डिसेंबर रोजी शरद पवारांचा वाढदिवस आहे.
त्यानिमित्त लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत शरद पवारांनी अनेक प्रश्नांची रोखठोक उत्तरे देत अनेक दावे केले आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला