शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात फोनवर संवाद ! राज्यपालांच्या सल्ल्यानंतर चर्चा

sharad Pawar & Ajit Pawar

मुंबई :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत राज्यपालांनी त्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले . त्यानंतर आज राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शरद पवार यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती आहे .

यावेळी राज्यपाल भेटीबाबत राज ठाकरे आणि पवार यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. राज्यात प्रश्न खूप आहेत. प्रश्नांची कमतरता नाही. कमतरता आहे ती फक्त निर्णय घेण्याची, असे  सांगतानाच निर्णय का घेतले जात नाहीत? कशासाठी हे सरकार कुंथत आहे? कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही, अशा शब्दात राज ठाकरेंनी राज्यपालांच्या भेटीनंतर ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER