पोलिसांना मनसेचे आव्हान; वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग दाखवू …

Eknath Shinde-MNS

मुंबई : “पोलिसांनो, वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग दाखवून देऊ महाराष्ट्र सैनिक” असे आव्हान मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी पोलिसांना दिले.  वसईत मंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात राडा घालणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केली. अर्वाच्य शिवीगाळ केल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला. मनसे नेहमी महाराष्ट्रातील पोलिसांच्या पाठीशी उभी राहात आली आहे, याची आठवण देऊन संदीप देशपांडे यांनी पोलिसांना आवाहन केले.  सरकारच्या मध्यस्थासारखे वागू नका. (MNS Leader Sandeep Deshpande Warning To Mumbai Police)

शिवसेनेचे दिग्गज नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वसईतील कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांनी – “आयुक्तसाहेब वेळ द्या, आयुक्तसाहेब वेळ द्या” अशा घोषणा दिल्या. वसई पोलिसांनी मनसेच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. शिवसैनिकांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना बेदम चोप देऊन कार्यक्रमातून बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

परिवहन सेवेवरून बविआ-शिवसेना आमने-सामने

वसई-विरार परिवहन सेवा सुरू करण्यावरून बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेचे राजकारण सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात परिवहन सेवा बंद झाली होती. मात्र दोन दिवसांपूर्वीच महापालिका हद्दीत बविआने उद्घाटन करून ती सुरू केली होती.हीच परिवहन सेवा आम्ही सुरू केली असल्याचा दावा करत, या परिवहन सेवेचे नूतनीकरण आणि लोकार्पण सोहळा वसई विरार महानगरपालिकेच्यावतीने आज आयोजित केला आहे. या सोहळ्यासाठी शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जव्हारमध्ये जादूटोणा (Black magic against Eknath Shinde) केला जात असल्याचे काही दिवसांपूर्वी उघड झाले होते. शिंदेंच्या फोटोला मांत्रिक पूजा घालताना व्हिडीओत दिसला होता. या प्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER