मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही – अनिल परब यांची टीका

Anil Parab

मुंबई :- सुपारी घेतल्याशिवाय मनसे (MNS) कोणतेही काम करू शकत नाही. त्यावरच त्यांचे अस्तित्व अवलंबून आहे, अशी बोचरी टीका शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी केली.

ते म्हणाले – वेगवेगळ्या पक्षांची सुपारी घेऊन झाली आहे. ज्या भाजपा नेत्यांना लोकसभा नुवडणुकीत ‘लाव रे तो व्हडिओ’ दाखवून उघडं- नागडं केलं. त्यांच्यासोबतच उघडे झोपले की काय होते ते मनसेला पुढे दिसेल. (Anil Parab criticized on mns and bjp also taunt to gopichand padalkar)

भाजपावर टीका करताना ते म्हणाले – सरकार जाईल ही स्वप्न बघतच भाजपाला पाच वर्षे काढायची आहेत. पाचव्या वर्षी पुन्हा त्यांचा स्वप्नभंग होणार आहे. सत्ता गेल्याने ते अस्वस्थ झालेत. कार्यकर्ते बिथरून कुठे जाऊ नयेत म्हणून हे त्यांना असे सांगावे लागते.

कोरोनाची (Corona) दुसरी लाट येऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. पुन्हा लॉकडाऊन करावे असे या सरकारचे मत नाही. पण परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असेल तर काही कठोर निर्णय घ्यावेच लागतील. लाट आलीच तर सरकारची तयारी आहे. रुग्ण संख्या कमी असली तरी सध्या हॉस्पिटल्स बंद न करण्याचा सूचना दिल्या आहेत, अशी माहिती परब यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : मनसेच्या परप्रांतियांच्या मुद्द्यावर बोट ठेवत युतीसाठी भाजपने घातली अट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER