मनसे-भाजपात दिलजमाई; असंच सहकार्य मिळाल्यास एकत्रितपणे…राज ठाकरेंकडून मोदींचे कौतुक

Raj Thackeray - PM Narendra Modi - Maharastra Today
Raj Thackeray - PM Narendra Modi - Maharastra Today

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णांची संख्याझपाट्याने वाढत चालली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत कोरोनाबाबत काही मागण्या केल्या होत्या. त्यातील एक मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. केंद्र सरकारने हाफकिन इन्स्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी दिली आहे. हाफकिन इन्स्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी मिळाल्यानंतर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. केंद्र सरकारकडून असंच सहकार्य मिळाल्यास आपण एकत्रितपणे या संकटावर मात करु, असे राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

‘१०० टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी ह्या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार. केंद्रसरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू हे नक्की’, असे ट्वीट राज ठाकरेंनी केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर राज ठाकरे महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांचे कौतुकही करताना दिसत आहेत. त्यामुळे भविष्यात मनसे आणि भाजप एकत्र येणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. आता राज ठाकरे यांनी थेट ट्विट करत मोदींचे आभार मानल्याने या गोष्टीला आणखीनच बळ मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button