मुंबई महापालिकेत आलेल्या निनावी लेटरवर मनसेची मोठी प्रतिक्रिया; संदीप देशपांडे म्हणाले …

मुंबईः आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महापालिकेत सध्या एका निनावी पत्राने कंत्राटदारांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे . या निनावी पत्रावरून आता मनसेनंही महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलंय. मुंबई महानगरपालिकेत आलेले निनावी लेटर हे काही नवीन नाही, हे ओपन सिक्रेट आहे, असं म्हणत मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी हल्लाबोल केला , ते प्रसार माध्यमांशी बोलत होते .

आज महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर होत आहे, निदान बेस्टचं विलीनीकरण करून आश्वासन पूर्ण करावं ही अपेक्षा असल्याचंही संदीप देशपांडेंनी सांगितलंय. 500 स्क्वेअर फुटांच्या घराला करमाफी देणार होते, त्याचा निर्णय झाला नाही. मुंबई महानगरपालिकेत आलेले निनावी लेटर हे काही नवीन नाही हे ओपन सिक्रेट आहे. ठराविक कंत्राटदारांनाच कंत्राटं दिली जातात. या लेटरची चौकशी व्हावी. वीरप्पण गॅंग महानगरपालिकेला लुटत असल्याचेही संदीप देशपांडे म्हणाले.

दरम्यान मुबंई महापालिकेला प्राप्त झालेल्या निनावी पत्रामुळे खळबळ माजली असली तरी पालिका प्रशासन याची दखल घेणार हा प्रश्न कायम आहे. निनावी पत्र पाठवणाऱ्या कंत्राटदारानं चौकशीची मागणी केली आहे. तीन कंत्राटदार कंपन्यांच्या निविदी पद्धती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER