राज ठाकरेंची बांगलादेशी मोहीम फोल ठरली; ताब्यात घेतलेले तिघे निघाले भारतीय

Raj Thackeray

मुंबई :- पुण्यात मनसेची ऑपरेशन बांगलादेशी मोहीम फोल ठरली आहे . शनिवारी बांगलादेशी असल्याच्या संशयावरून तीन जणांना ताब्यात घेतले. ते भारतीय निघाले आहेत. पुणे पोलिसांनी तिघांनाही सोडून दिले आहे. मात्र घडलेल्या प्रकाराबद्दल तिघांनाही मनस्ताप सहन करावा लागला .

माहितीनुसार पुण्याच्या धनकवडीतील बालाजीनगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बांगलादेशी घुसखोरांचा शोध सुरू केला होता. शनिवारी सकाळी मनसेचे तब्बल ५० कार्यकर्ते पुण्यातील बालाजीनगर परिसरात नागरिकांचे ओळखपत्र तपासत होते.

मनसेचा विरोधकांची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न – शरद पवार

त्यातील तीन संशयित बांगलादेशी घुसखोरांना मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले होते . मात्र आता ते भारतीय असल्याची माहिती समोर आली आहे .दरम्यान काही दिवसांपूर्वी मनसेने ठाणे, बोरिवली या भागातील बांगलादेशी घुसखोरांची शोधमोहीम केली होती. यावेळी ठाण्यातील किंगकॉंगनगर येथे राहणाऱ्या तीन बांगलादेशी कुटुंबांना मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. यावेळी त्या कुटुंबाकडे ओळखपत्र, पॅनकार्ड, आधार कार्ड आदी गोष्टी मिळाल्या. मात्र त्यांच्याकडे बांगलादेशाचा पासपोर्टही आढळून आल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली होती.