लॉकडाऊनपेक्षा मृत्यूदर कसा कमी करता येईल याचे नियोजन करा; मनसे नेत्याचा सल्ला

मुंबई :- राज्यात कोरोनाचे संकट (Corona Crises) दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . राज्य सरकारने सरसकट लॉकडाऊनचा आततायी निर्णय अजिबात घेऊ नये, त्यापेक्षा नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्यावर जोर द्यावा, अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी केली आहे.

गेल्या फेब्रवारी महिन्यापासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन (Corona Lockdown) किंवा निर्बंध घातले जात आहे. यावरुनच बाळा नांदगावकरांनी ट्वीट करत राज्य सरकारवर निशाणा साधला.

राज्य सरकारने सरसकट लॉकडाउनचा आततायी निर्णय अजिबात घेऊ नये. त्यापेक्षा नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्यावर जोर द्यावा. तसेच बाकी अनेक राज्यात जे आपल्या महाराष्ट्रापेक्षा अनेक अर्थाने मागे आहेत, तिथे मृत्यू दर हा अतिशय कमी आहे. हा ही सरकारसाठी संशोधनाचा विषय आहे. ते कमी चाचण्या करतात असे कारण देण्यापेक्षा आपल्या राज्यातील मृत्यूदर कसा कमी करता येईल याचे नियोजन करावे. आधीच आर्थिकदृष्टया त्रस्त जनतेला लॉकडाऊन करून अडचणीत आणू नये, असे ट्वीट बाळा नांदगावकर यांनी केले आहे.

ही बातमी पण वाचा : पुण्यात लॉकडाऊन नाही; कडक निर्बंध लागू करणार : अजित पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER