कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबीयांची घरपट्टी माफ करा, मनसेचे आवाहन

मुंबई :- कोरोनाच्या  (Corona Virus) साथीत अनेक परिवार उद्ध्वस्त झाले आहेत. काही परिवारातील कर्त्या व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाल्याने परिवारावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यांच्या कुटुंबांना यावर्षी घरपट्टी माफ करा, असे आवाहन मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी केले आहे.

कोरोनामुळे ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे अशा परिवारांना १ लाख रुपयांची मदत करण्याची मागणी बाळा नांदगावकर यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. अशा कुटुंबाना यावर्षी घरपट्टी माफ करण्याची मागणी केली आहे. सर्वच स्थानिक संस्थांनी हे करून सामान्य जनतेला त्वरित दिलासा द्यावा. राज्य सरकारने सरसकट तसा आदेशच दयायला हवा अशीही मागणी त्यांनी केली.

ही बातमी पण वाचा : मनसेने उघड केला बीकेसी कोविड सेंटरचा भोंगळ कारभार, भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

बाळा नांदगावकर यांनी ट्विट, केले – महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच महापालिका या श्रीमंत आहेत अनेकांकडे हजारो कोटींच्या ठेवी आहेत. हा जनतेचा पैसा आहे आणि हा जनतेच्याच कामाला आला पाहिजे. कोरोना मुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या घरच्यांना यावर्षी घरपट्टी माफ करणे गरजेचे आहे. सर्वच स्थानिक संस्थांनी हे त्वरित करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा. राज्य सरकार ने सरसकट तसा आदेशच दयायला हवा.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button