अ‍ॅमेझॉनविरोधात मनसे आणखीनच आक्रमक, पुण्यानंतर मुंबईतील ऑफिस फोडले

Amazon-Mumbai-mns

मुंबई : अ‍ॅमेझॉन (Amazon) कंपनीने राज ठाकरे (Raj Thackeray) यांना न्यायालयात खेचल्यानंतर आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) पुण्यानंतर मुंबईतील अ‍ॅमेझॉनची कार्यालयं फोडली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील चांदिवली येथील अ‍ॅमेझॉनच्या दोन कार्यालयात घुसून तोडफोड केली. यावेळी कार्यकर्त्यांकडून ‘मराठी नाय तर अ‍ॅमेझॉन नाय’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. अ‍ॅमेझॉनच्या आणखी एका गोदामाची तोडफोड केली आहे. हे सर्व मनसैनिक चांदीवली मतदार संघातील आहेत.

ही बातमी पण वाचा:- मराठीसाठी मनसे आक्रमक, कार्यक्रर्त्यांनी फोडलं अ‍ॅमेझॉनचं कार्यालय

यापूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांंनी औरंगाबाद आणि पुण्याच्या कोंढवा येथील मनसेच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. त्यानंतर आता मुंबईतही असाच प्रकार घडला आहे. त्यामुळे आता हे लोण राज्यभरात पसरण्याची शक्यता आहे. या सगळ्यामुळे अ‍ॅमेझॉन विरुद्ध मनसे हा वाद आणखीनच चिघळला आहे.

अ‌ॅमेझॉनने मराठी भाषेचा समावेश केल्यास मराठी लोकांना व्यवहार करणे सोपे होईल आणि ते संकेतस्थळावरुन आवश्यक वस्तूंची योग्य निवड करू शकतील, असे मनसेचे म्हणणे होते. मात्र, अ‌ॅमेझॉनकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने मनसेने अ‌ॅमेझॉनविरोधात मोहीम हाती घेण्यात आली होती. अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅपवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्यांच्या मालाची डिलिव्हरी होऊन देणार नाही, अशी ठाम भूमिका मनसेने घेतली आहे. याशिवाय ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर लिहिलेले बॅनर वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी परिसरात लावण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER