राज ठाकरेंचा उदयनराजेंना जाहीर पाठिंबा!

Udayan Raje-Raj Thackeray

सातारा :- आगामी लोकसभा निवडणुकीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माघार घेतली असली तरीही केंद्रातील मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मते देण्यास आणि प्रचार करण्यास सांगितले आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उदयनराजे भोसले यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच उदयनराजे यांची भेट घेतली आणि पाठिंबा जाहीर केला. उदयनराजे भोसले यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

ही बातमी पण वाचा : गुढीपाडव्यापासून देशात ‘राज’पर्व येईल; मनसे कार्यकर्त्यांकडून पोस्ट शेअर

उदयनराजे भोसले यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीचे फोटो ट्विट करत लिहिलं आहे की, ‘सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भेटून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला. यावेळी जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.’