राज ठाकरे मास्क घालत नाहीत, पण… ; मनसेचा मोठा निर्णय

मुंबई :- राज्यात कोरोनाचे संकट (Corona Crises) दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) पक्षाचा वर्धापनदिन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी माहिती मनसेकडून देण्यात आली आहे. दरम्यान, वर्धापनदिन सोहळा रद्द केला असला तरी राज्यभरात 9 मार्च रोजी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी केली जाणार असल्याची माहितीही मनसे नेते नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांनी दिली आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि गर्दीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे यंदा मनसेचा वर्धापनदिन सोहळ्याचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नितीन सरदेसाई यांनी ही माहिती दिली आहे. त्याऐवजी 9 मार्च रोजी मनसेच्या वर्धापनदिनी राज्यभरात सदस्य नोंदणी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

ही बातमी पण वाचा : शिवसेना आणि सचिन वझेंबाबत मनसेचे ट्विट, यांचे संबंध काय ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER