आशालता वाबगावकरांच्या निधनानंतर मनसे संतापली; मालिकांचे चित्रीकरणच बंद करण्याचा दिला इशारा

Raj Thackeray-Ashalata Wabgaonkar

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi Movie) गोड व्यक्तिमत्त्व म्हणून आशालता वाबगावकरांची (Ashalata Wabgaonkar) ओळख होती. दुर्दैवाने त्यांचे साताऱ्याच्या खाजगी रुग्णालयात कोरोनाने निधन झाले. ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी त्या साताऱ्याला आल्या होत्या. याच ठिकाणी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. मराठी-हिंदी सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रीच्या अशा अचानक जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना संतापली असून मालिकांच्या शूटिंगसाठीच्या सेटवर कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यात हलगर्जीपणा न करण्याबाबत मनसेने इशारा दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी याबाबत एक पत्र लिहिलं आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवरूनही त्यांनी ट्विट केलं आहे. ‘कोविड प्रोटोकॉलच्या पालनात कोणतीही तडजोड, हलगर्जीपणा केल्यामुळे जर अभिनेते आणि तंत्रज्ञ यांचा जीव धोक्यात येत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करेल.’ असं म्हटलं आहे.

“आपल्या मनोरंजन वाहिनीच्या तसेच निमिर्ती संस्थेच्या मालिकांच्या सेटवर कोविड प्रोटोकॉलचे सर्वोतोपरी पालन करणे ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे, याचं भान प्रत्येक मनोरंजन वाहिनीने तसेच मालिकांच्या निर्मात्यांनी बाळगायलाच हवं. कोविड प्रोटोकॉलच्या पालनात कोणतीही तडजोड, हलगर्जीपणा केल्यामुळे जर अभिनेते आणि तंत्रज्ञ यांच्या जीव धोक्यात येत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करेल.” असं अमेय खोपकर यांनी पत्रात म्हटलं आहे. कोरोनाच्या संकटात अनेक ठिकाणी मालिकांचे चित्रीकरण सुरू असून टीममधील काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याच दरम्यान मनसेने मालिकांचे निर्माते आणि सर्व मनोरंजन वाहिन्यांच्या संचालकांना इशारा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER