अमित ठाकरे यांचा वाढदिवस, मनसे ११००० कुटुंबांना वाटणार ‘आर्सेनिक अल्बम ३०’

MNS-Amit Thackeray

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेना औरंगाबाद शाखेच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त कोरोना विरोधात लढण्यासाठी शरीरात प्रतिकार शक्ती निर्माण व्हावी यासाठी आयुष मंत्रालयाने मान्यता दिलेल्या आणि शिफारस केलेल्या आर्सेनिक अल्बम ३० या होमियोपॅथी गोळ्यांचे औरंगाबाद मधील ११००० कुटुंबांना मनसे तर्फे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांच्या वतीने मोफत वाटप करण्यात येणार आहे.

ही बातमी पण वाचा:- येत्या दोन दिवसांत सिंधुदुर्गात 5 लाख होमियोपॅथी गोळ्या वाटण्याचा नितेश राणे यांचा निर्धार

आपली प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी “आर्सेनिक अल्बम ३०“ ही होमियोपॅथिक औषधी उपयोगी ठरत आहे. हे औषध दर महिन्याला सलग तीन दिवस अनशा पोटी सकाळी घेतल्यास कोरोनाला प्रतिकार करते असे सिद्धं झाले आहे. औरंगाबादच्या विविध भागात ५ टप्प्यात या औषधीचे वाटप करणार आहे असे जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे यांनी कळवले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER