… हे आम्ही राज ठाकरे यांच्याकडून शिकलो आहोत : अमेय खोपकर

Raj Thackeray-Ameya Khopkar-kangana-ranut

मुंबई : कंगनाच्या (Kangana Ranaut) ‘ओपन चॅलेंज’ वरून मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी पुन्हा एक ट्विट केले आहे. कंगनाचं एअरपोर्टवर मनसे (MNS) स्टाईलमध्ये स्वागत करण्यात कार्यकर्ते उत्सुक असतील, असं काहींना वाटलं असेल; मात्र कोणाला किती महत्त्व द्यायचं, हे आम्ही राज ठाकरे यांच्याकडून शिकलो आहोत, असे वक्तव्य अमेय खोपकर यांनी केले आहे.

प्रत्येक वेळी सोशल मीडियावर चिथावणीखोर वक्तव्य करून खळबळ उडणवणे, ही मानसिक विकृती आहे. मात्र, या विकृतीमागे कोणाचं तरी डोकं आहे, याची आम्हाला कल्पना आहे. एअरपोर्टवर गर्दी गोळा करून स्वत:ला लाईम लाइटमध्ये ठेवण्याचा कंगनाचा प्रयत्न असल्याचे अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.

तसेच एखाद्या मनोरुग्णालयात कंगनावर उपचार करायला हवा आणि तिच्या विरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करावा, अशा दोन मागण्याही अमेय खोपकर यांनी केल्या आहेत. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी (POK) केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER