राजसाहेबांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तुमच्या पाठीशी आहे ; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला मनसेचे समर्थन

raj thackeray and uddhav thackeray

मुंबई :- अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरण (Sushant Singh Rajput case) आणि बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन यामुळे निर्माण झालेल्या वादावर मनसेने पहिल्यांदाच  भूमिका मांडली . जाणीवपूर्वक बॉलिवूडला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या वक्तव्यानंतर मनसेनेही बॉलिवूड ड्रग्ज वादात उडी घेतली आहे. अमेय खोपकर यांनी ट्विटरवरून तंत्रज्ञ आणि कलाकारांना धीर दिला आहे.

“महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही असली कारस्थानं कधीही यशस्वी होऊ देणार नाही. तंत्रज्ञांपासून कलाकारांपर्यंत कुणीही घाबरायची गरज नाही; कारण राजसाहेबांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि यापुढेही राहणार, हा आमचा शब्द आहे. ” अशी हमी खोपकर यांनी ट्विटरवरून दिली.

“भूतकाळातही बॉलिवूडमधील कलाकारांना गंभीर गुन्ह्याखाली अटक झाली, त्यांना शिक्षा झाल्या; पण म्हणून कुणीही पूर्ण बॉलिवूडलाच खलनायक ठरवलं नाही. आता मात्र जाणीवपूर्वक बॉलिवूडलाच बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. एवढंच नाही, तर फिल्मसिटीच मुंबईबाहेर हलवायचं कुटील कारस्थान रचलं जात आहे.” असा घणाघात अमेय खोपकरांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER