जितेंद्र आव्हाडांच्या या फोटोवरून मनसेची ठाकरे सरकारवर टीका

mns-amey-khopkar-criticized-on-ncp-jitendra-awhad

मुंबई : शिवसेनेची महत्त्वाकांक्षी शिवथाळी योजनेचा काल प्रजासत्ताकदिनी शुभारंभ झाला. मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या योजनेचं उद्घाटन करण्यात आले तसेच, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या थाळीचे जेवन करून शिवथाळीचे उद्घाटन केले. याच मुद्द्यावरून मनसेने आव्हाडांचा जेवतानाचा फोटो पोस्ट करून त्यांच्यावर टीका केली आहे.

’10 रुपयाच्या थाळीसोबत 20 रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब माणूस ! ‘ असं ट्वीट मन,से नेते अमेय खोपकर यांनी केले आहे.

जितेंद्र आव्हाड हे शिवथाळी उद्धाटनावेळी जेवत असताना त्या टेबलवर बिसलेरी पाण्याची बॉटल ठेवण्यात आली आहे. याच मुद्द्यावरून मनसेने सरकारवर टीकास्त्र सोडले.

दरम्यान, प्रत्येक केंद्रात रोज किमान 75 आणि कमाल 150 जणांना दुपारी 12 ते 2 यावेळेत शिवभोजन थाळी मिळणार आहे. यामध्ये सुसूत्रता असावी, यासाठी जेवणाऱ्याचे छायाचित्र, नाव आणि मोबाइल क्रमांकदेखील नोंदवून घेण्यात येणार आहे. यासाठी महा अन्नपूर्णा या नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर येथे लोकांना जेवता येणार आहे.

तुम्हीही चालवू शकता शिवभोजन योजना

  • तुम्हाला जर राज्याच्या या उपक्रमात वाटेकरी व्हायचं असेल तर सरकारने यासाठी तरतूद केली आहे.
  • – शिव भोजनालय सुरू करू इच्छिणाऱ्या व्यक्तीकडे स्वत:ची पर्याप्त जागा असणे गरजेचे आहे.
  • – योजना राबविण्यासाठी सद्य:स्थितीत सुरू असलेल्या खानावळ, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट, अशासकीय संस्था यापैकी सक्षम असलेल्या भोजनालयाची निवड करण्यात येईल.
  • – महापालिका स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तर तालुका स्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल.
  • शेतकऱ्याने शक्कल लढवली आणि 1 एकरमध्ये घेतलं लाखोंचं उत्पन्न
  • – गरीब किंवा मजूर लोकांची वर्दळ जास्त असलेल्या जिल्हा रुग्णालये, बस स्थानके, रेल्वे स्थानक परिसर, बाजारपेठा, शासकीय कार्यालये यासारख्या ठिकाणी थाळीची विक्री केली जाईल.
  • – योजनेवर संनियंत्रण, पर्यवेक्षण ठेवण्यासाठी राज्य स्तरावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती असेल. ही समिती सर्व पर्यायांचा विचार करून योजनेचा पुढील टप्पा ठरविण्याची कार्यवाही करेल.
  • – सेंट्रल किचन, नामवंत स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक न्यास व सीएसआर आणि व्हीएसटीएफ इत्यादींच्या सहभागाबाबत निर्णय घेईल आणि शासनाच्या सहभागाबद्दल रुपरेषा ठरवेल.

त्याचप्रमाणे, ही योजना शाश्वत आणि टिकणारी होण्यासाठी समिती क्रॉस सबसिडी आणि सार्वजनिक- खाजगी भागीदारीचे तत्व वापरण्यावर भर देणार आहे.