शिवसेनेला मनसेची ॲलर्जी, म्हणून… ; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा

Sandeep Deshpande - CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात कोरोना (Corona) संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लोकल सुरू करण्यासाठी काही दिवसांपूर्वी मनसेच्या नेत्यांनी सविनय कायदेभंग करीत लोकलमधून प्रवास केला होता. ठाकरे सरकारकडून (Thackeray Government) त्यांच्यावर नियमभंग केल्याप्रकरणी कारवाईदेखील करण्यात आली.

आता पुन्हा मनसे नेता संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) निशाणा साधला आहे .मुंबईत (Mumbai) गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rains) सुरू आहे. जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईची पाहणी केली होती. आता मनसे (MNS) नेता संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे.

तुम्हाला शिकायचंय म्हणून आम्हाला गिनी पिग बनवू नका,” असे  म्हणत  देशपांडे त्यांनी टोला लगावला . 

सरकारचं ना पावसाचं नियोजन ना कोरोना नियंत्रणासाठी योग्य नियमावली. २५ वर्षे शिवसेना सत्तेत आहे आणि दरवर्षी हीच गोष्ट घडते. कोरोनामुळे, पावसामुळे लोकांचे जीव जात आहेत, तर मग लोकांनी टॅक्स का भरायचा, असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. शिवसेनेला मनसेची ॲलर्जी, त्यामुळेच ते रेल्वे विषयावर आमच्याशी चर्चा करीत नाही. सरकारची मानसिकता हुकूमशाहीची म्हणूनच लोकल सेवा सुरू करण्याबद्दल आमच्याशी चर्चा करत नाहीये, असा आरोपही देशपांडे यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER