पुण्यातील कामगारांसाठी मनसे आक्रमक, कामगारांना कमी केल्यामुळे कार्यालयाची केली तोडफोड

MNS agitation

पुणे : सर्वसामान्यांच्या न्याय्य मागण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी मनसे नेहमीच पुढे आली आहे. पुढच्याला समज देण्याची मनसेची भाषा आक्रमक असली तरी त्यांच्या याच स्टाईलने अनेकांना न्यायदेखील मिळाला आहे. आताही मनसेने पुण्यात बेकायदेशीररित्या कामगारांना कामावरून काढल्याच्या करणावरून कंपनीत राडा घातला. बेकायदेशीररित्या कामगारांना कमी केल्यामुळे मनसेने (MNS) पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा धारण केला आहे. मनसेने फ्रेसेनियस काबी कंपनीच्या (Fresenius Company) पुणे येथील कार्यालयाची तोडफोड केली आहे. या तोड़फोडीचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

पुण्याच्या फ्रेसेनियस काबी कंपनीच्या कामागारविषयक धोरणावर संतापून मनसेने या कार्यालयाची थेट तोडफोड केली आहे. फ्रेसेनियस कंपनीत कामगारांना बेकायदेशिरित्या कामावरुन कमी केले जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. तसेच, या कंपनीकडून कामगारांचा पगारही वाढवला जात नसल्याचं मनसेने म्हटलं आहे. याच कारणांमुळे मनसेने पुणे येथील या कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER