मनसेचे वृक्षतोडविरोधात आंदोलन

Hathras case-MNS

धुळे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, यावेळी धुळ्यात मनसेकडून (MNS) आंदोलन करण्यात आले आहे. मनसेने अधिकृत वृक्षतोड (tree cutting) आणि वृक्ष प्राधिकरण समितीविरोधात प्रतीकात्मक वृक्ष बचाव आंदोलन सुरू केले आहे.

धुळे शहरात ५ डिसेंबर २०२० ला अधिकृत वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली आहे. या मागणीसाठी मनसेच्यावतीने धुळे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू केले. सर्वसामान्यांना आणि पर्यावरणप्रेमींना अभिमान वाटेल, असे आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनाकडे धुळे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रतीकात्मक वृक्ष बचाव आंदोलन छेडले आहे.

बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांना मनपा प्रशासन पाठीशी घालण्याचे काम करत आहे, असा आरोपदेखील यावेळी करण्यात आला आहे. “उच्च न्यायालयाच्या परिपत्रकानुसार मनपा वृक्षसंवर्धनासाठी वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य किमान बी.एस्सी. सायन्स अथवा ऍग्रीकल्चर डिप्लोमा असणे आवश्यक आहे. यासंदर्भात कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच संघटना पाच वर्षे नोंदणीकृत असावी आणि त्या सदस्यांचे पर्यावरण कार्य असावे तसेच पुरस्कारही असावा. ही संस्था सामाजिक वनीकरण विभागाकडे नोंदणीकृत असावी, असे असूनसुद्धा मनपा प्रशासन कुठलीही माहिती देण्यास तयार नाही.” असा आरोप मनसेने केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER