मनसे आक्रमक ; आदित्य ठाकरेंना सांगितले टाईमपास कशाला म्हणतात …

Raj Thackeray - Aaditya Thackeray

मुंबई :  मनसे (MNS) आणि शिवसेनेते गेले काही दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरू आहे. मनसेने शिवसेनेचा उल्लेख विरप्पन गॅंग अस केल्यानंतर हा संघर्ष अधिक तीव्र झाला व यामध्ये थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उडी घेतली आणि मनसे हा पक्ष आहे की टाईमपास टोळी अशा शब्दांत मनसेची खिल्ली उडवली होती.त्यानंतर आता मनसेनेही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray ) यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
अनेक उदाहरणांसह नेमका टाईमपास कशाला म्हणतात याची यादीच मनसेने ट्विट करून सादर केली आहे.

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेणं आणि अनेक वर्षे तिथं स्मारक न करणं याला टाईमपास म्हणतात, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

औरंगाबादचं नामांतर ‘संभाजीनगर’ करू” यात शिवसेनेने 30 वर्षं घालवली याला म्हणतात टाइमपास!, मनसेचे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबईकरांना चांगले रस्ते, बगीचे, शाळा देऊ असं आश्वासन शिवसेना प्रत्येक महापालिका निवडणुकीत देते याला म्हणतात टाईमपास, असंही कीर्तिकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER