नाशीकमध्ये मनसेने बसवर लावलेत ‘संभाजीनगर’चे स्टिकर

Nashik - Bus Sticker - Sambhajinagar

नाशीक : ठक्कर बाजार बस स्थानकात आज मनसेच्या (MNS) कार्यकत्यांनी घोषणा देत नाशिक (Nashik) – औरंगाबादच्या (Aurangabad) सर्व बसवर, संभाजीनगरचे स्टिकर लावलेत.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय. राज साहेब आज बढो, हम तुम्हारे साथ है. मनसे जिंदाबादच्या घोषणा दिल्यात. यावर्षी औरंगाबाद मनपाची निवडणूक आहे व पुढच्या वर्षी नाशीक मनपाची निवडणूक आहे. औरंगाबादच्या नामांतरणाच्या मुद्यांवरून मनसेने नाशीक मनपाच्या निवडणुकीच्या प्रचाराचीही सुरुवात केली आहे, अशी चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER