मराठी येत नाही बोलणाऱ्या पोलिसावर मनसे कार्यकर्ते भडकले

MNS activists got angry with the police for not speaking Marathi

मुंबई : मराठी भाषेला घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) आक्रमकपणा कल्याणमध्ये बघायला मिळाला आहे. एका आरपीएफ जवानाने कल्याणच्या मनसे पदाधिकाऱ्यांना हिंदीत बोलायला सांगितले , यावरुन मनसे पदाधिकाऱ्यांनी भर रस्त्यात जवानाची शाळा घेतली.

कल्याण पश्चिमेतील स्कायवॉकवर तृतीयपंथीय नागरिकांकडून जबरदस्तीने पैसे घेतात, अशी तक्रार मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे आली होती. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, मनसे पदाधिकारी रोहन आक्केवार आणि इतर कार्यकर्ते काल (25 फेब्रुवारी) रात्री स्टेशन परिसरात पोहोचले. गाडी पार्किंग करत असताना तेथील आरपीएफ जवनांनी मनसे पदाधिकाऱ्यांना मज्जाव केला.

आरपीएफ जवान हिंदीत बोलत असल्याने एका कार्यकर्त्याने मराठीत बोला, असं सांगितलं. त्यावर जितेंद्र सिंग नावाच्या जवानाने तुम्ही हिंदीत बोला, मला मराठी येत नाही, असे उत्तर दिले. त्यानंतर मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर आणि इतर कार्यकर्त्यांनी त्या आरपीएफ जवानाची भररस्त्यात मराठीची शाळा घेतली. महाराष्ट्रात ड्युटी करता आणि मराठी बोलता येत नाही. आम्हाला सांगता हिंदीमध्ये बोला हे चालणार नाही, असा दम दिला. त्यानंतर पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER