राज ठाकरेंचे ‘मिशन पुणे’; ग्रामपंचायतसाठी कंबर कसली

Raj Thackeray

मुंबई : राज्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुका मनसे लढवेल अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली . मनसे जर गावपातळीवरच्या निवडणुकीत ताकदीनिशी उतरली तर याचा फटका नेमका महाविकास आघाडीला बसणार की भाजपला हे पाहणे तितकेच महत्त्वाचे  ठरणार आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांना राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याचे आदेश दिल्यानंतर आता राज ठाकरे स्वत:ही सक्रिय झाले आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी राज ठाकरे शनिवारी संध्याकाळी पुण्यात दाखल होत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीची रणनीती निश्चित करणार असल्याचे समजते. माहितीनुसार, राज ठाकरे साधारण ६ वाजताच्या सुमारास पुण्यात दाखल होतील.

ते दोन दिवस पुण्यात मुक्काम करणार आहेत. मनसेकडून पुण्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार उभे केले जाणार आहेत. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून तालुकापातळीवर मनसे नेत्यांच्या आढावा बैठका सुरू आहेत. आतापर्यंत इंदापूर, दौंड, मुळशी, शिरूर तालुक्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडल्या आहेत. या सगळ्यांचा अहवाल आता राज ठाकरे यांच्यासमोर मांडला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर मनसेकडून ग्रामपंचायत निवडणुकीची रणनीती निश्चित केली जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER