कल्याणमध्ये मनसेला मोठा झटका; ३२० पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा

MNS & Kalyan

मुंबई : आगामी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. कल्याणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ३२० पदाधिकाऱ्यांनी सरसकट पदांचे राजीनामे दिले आहेत. यामध्ये कल्याण पूर्व विभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष, गट अध्यक्ष यांचा समावेश आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी मनसेचे उपशहर अध्यक्ष संजय राठोड यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना ओळखून संजय राठोड यांनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसे नगरसेवकांची संख्या जरी गेल्या पाच वर्षांत  कमी असली तरी मनसेला आगामी निवडणुकीत चांगली संधी आहे. मात्र ३२० पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटका मनसेला आगामी महापालिका निवडणुकीत बसू शकतो. त्यामुळे पक्षश्रेष्ठी नेमका काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER