मुंबई महापालिकेचा २०१७-१८अर्थसंकल्प सादर : रस्ते पुनर्बांधणीसाठी भरीव तरतूद

BMC

मुंबई: मुंबई महापालिकेचा २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर झाला. महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात कोस्टल रोडसाठी १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी अंदाजित खर्च १२ हजार कोटी आहे. तसेच गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी १३० कोटींची तरतूदही करण्यात आली. त्याचसोबत मुंबईतला पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी वाहनतळांची संख्या तीन पट वाढणार असल्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

मात्र या अर्थसंकल्पातून बेस्टच्या पदरी निराशा पडली आहे. अर्थसंकल्पात बेस्टच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. अर्थसंकल्पात कोस्टल रोडसाठी १ हजार कोटींची तरतूद केली असून, यासाठी १२ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तसंच गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी १३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार दिवसेंदिवस मुंबईकरांना पार्किंगचा प्रश्न सतावत असल्यानं वाहनतळांची संख्या तीन पट वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

वाहनतळांची संख्या ९२ वरुन ही संख्या २७५ करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे, तसंच तीन ठिकाणांच्या भूमिगत वाहनतळांसाठी १ कोटींची तरतूद केली आहे. दुसरीकडे रस्ते कामांमध्ये यंदा बरीच काटकसर करण्यात आली आहे. रस्ते पुनर्बांधणीसाठी १०९५ कोटींची तरतूद केली असून, मागील वर्षी २८८६ कोटी एवढी तरतूद करण्यात आली होती. तर यंदा नालेसफाईसाठी ७४ कोटींची तरतूद केली आहे.

मुंबई महापालिकेचा २०१७-१८ साठीचा अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी

बेस्टसाठी कोणतीही भरीव तरतूद नाही

कोस्टल रोडसाठी १ हजार कोटींची तरतूद, संपूर्ण प्रकल्पाची अंदाजित रक्कम १२ हजार कोटी

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी १३० कोटींची तरतूद

रस्ते दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी १०९५ कोटींची तरतूद, गेल्या वर्षी २८८६ कोटी इतकी तरतूद

मुंबईतला पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी वाहनतळांची संख्या तीन पट वाढणार

वाहनतळांची संख्या ९२ वरुन ही संख्या २७५ करणार,

तीन ठिकाणांच्या भूमिगत वाहनतळांसाठी १ कोटींची तरतूद

माहिती आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत महापालिका रुग्णालयांमध्ये अद्ययावत माहिती प्रणाली उभारणार

मेडिकल हिस्ट्री, प्राथमिक रिपोर्टस्, रुग्णांची नोंदणी, इ. माहितीसाठी सॉफ्टवेअर

माहुल आणि गजदरबांध पंपिंग स्टेशनसाठी ६५ कोटींची तरतूद

शालेय विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मोजमाप ठेवण्यासाठी शालेय विभागाचे ऑनलाइन पोर्टल तयार करणार

नालेसफाईसाठी ७४ कोटींची तरतूद

मिठी नदीच्या किना-यावरील मोकळ्या जागांवरील अतिक्रमणे हटवणे, सुशोभीकरण करणे यासाठी २५ कोटींची तरतूद

कॅशलेस व्यवहार आणि एम गव्हर्नन्ससाठी महापालिकेच्या ११५ सेवा

एम- गव्हर्नन्स ( मोबाईलद्वारे नागरी सुविधा) अंतर्गत आणणार, कॅशलेस व्यवहारास चालना देणार

शालेय विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मोजमाप ठेवण्यासाठी शालेय विभागाचे ऑनलाईन पोर्टल तयार करणार

उघड्या नाल्यांचे आच्छादीकरणासाठी नाल्यांवर अ‍ॅक्रेलिक पत्रे टाकणार,

मुलुंड, कांदिवली येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबवणार, ९ कोटींची तरतूद

पर्जन्य जलवाहिन्यांसाठी ४७५ कोटींची तरतूद

महापालिका रुग्णालयात ९ नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स सुरू करणार

प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया संसर्गरहित होण्यासाठी हे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर गरजेचे

यासाठी २१.५० कोटींची तरतूद

महापालिका रुग्णालयातील व्हेंटिलेटर्सची संख्या ४०० पेक्षा जास्त वाढवण्यासाठी ३० कोटींची तरतूद

महापालिकेच्या २८ प्रसूतिगृहांचा दर्जा वाढवण्यासाठी, आधुनिकीकरणासाठी ८.९० कोटींची तरतूद

महापालिकेच्या दवाखान्यातून नि:शुल्क निदान सेवा उपलब्ध करून देणार, त्यासाठी १६.१५ कोटींची तरतूद

गोरेगाव पूर्वमध्ये मल्टिस्पेशॅलिटी क्लिनिक सुरू करणार, १० लाखांची तरतूद

हगणदारीमुक्त मुंबईसाठी तरतूद, सामुदायिक शौचालये ७६ कोटी,

घरगुती शौचालये ५.७० कोटी, सार्वजनिक शौचालये २.८८ कोटी

सार्वजनिक शौचालयांमध्ये वीज, पाणी पुरवठ्यासाठी २६.३७ कोटींची तरतूद.

मात्र, महिला शौचालयांसाठी भरीव तरतूद नाहीच.

मुंबईभरात येत्या वर्षांत महिलांसाठी केवळ ८ नवी शौचालये

राईट टू पीसाठी महापालिकेची भरीव तरतूद नाही

मुंबई शहराच्या साफसफाईसाठी खास यांत्रिक झाडू आणणार, २० कोटींची तरतूद

सामूहिक शौचालयांध्ये १०० नवीन सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन आणि इन्सनरेटर स्थापित करणार,

यासाठी १ कोटींची तरतूद

डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा प्रक्रियेसाठी, कच-यापासून वीजनिर्मितीसाठी १५० कोटींची तरतूद

येत्या वर्षात मुंबईत ८४ मैदानांचा विकास करण्यासाठी २६.८० कोटींची तरतूद

मुंबईतल्या २० उद्याने/मनोरंजन मैदानांच्या विकासासाठी ७० कोटींची तरतूद

८ ठिकाणी नवे जलतरण तलाव, कांदिवलीत ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव यासाठी ४५ कोटींची तरतूद

वांद्रे किल्ला क्षेत्रासाठी १ कोटींची तरतूद

वांद्रे तलावाच्या सुशोभीकरणासाठी ३ कोटींची तरतूद

मुंबई सागरी किनारा रस्ता १००० कोटींची तरतूद

गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता – १३० कोटी

रस्ते व वाहतूक खाते – १०९५ कोटी

पूरप्रवण क्षेत्रांचे निर्मूलन – ७४ कोटी

मिठी नदी – २५ कोटी

उघडे नाले बंदिस्त करणे – ९ कोटी

पर्जन्य जलवाहिन्या – ४७५ कोटी

आरोग्य व वैद्यकीय सेवा – ३३११ कोटी

शिक्षण – २३११ कोटी

घन कचरा व्यवस्थापन – २१२२ कोटींची तरतूद

उद्याने – २९१ कोटी

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय – ५० कोटी

अग्निशमन दल – १९५ कोटी

बाजार व मंड्यासाठी – ७५ कोटी

इमारत परिरक्षण – ३२० कोटी

देवनार पशुवधगृह – २ कोटी

महापालिका मुख्यालयाच्या दुरुस्तीसाठी – १० कोटी

अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह – ५ कोटी

यांत्रिकी व विद्युत खाते – १५ कोटी

पीएनजी गॅस प्रकल्प – १ कोटी

आपत्कालीन विभाग – ११ कोटी ७५ लाख

कामगार विभाग – १२ कोटी ६७ लाख

सुरक्षा विभागाचे आधुनिकीकरण – १५ कोटी

टेक्सटाईल म्युझियम बांधणे – २ कोटी ५० लाख

भारताचे स्वातंत्र्य संग्रहालय – १ कोटी

भाऊ दाजी लाड संग्रहालय – ७ कोटी

रायफल क्लब – ५० लाख

पाणी पुरवठा सुधारणा – २७ कोटी ८१ लाख

जल बोगदे – २५ कोटी

जलाशयांची दुरुस्ती – १८ कोटी ७० लाख

जलविभागासाठी – १९४ कोटी

उद्याने – १३ कोटी ३० लाख

मलनिःसारण प्रकल्पांसाठी – ४४४ कोटी