आमदारांची निवड राज्यपाल करतील, आमचा संबंध नाही ; गिरिश महाजन यांचे स्पष्टीकरण

Girish Mahajan

जळगाव : राज्यपाल नियुक्त आमदारांवरून आता एक नवीन कुजबुज सुरू झाली आहे. विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार निवडीवरून शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. यावरून भाजपा महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोपही पाहायला मिळत आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसंदर्भात ठाकरे सरकारने नावे राज्यपालांकडे पाठवली आहेत, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही, निकषानुसार राज्यपाल त्यांची निवड करतील, असं स्पष्टीकरण माजी मंत्री आणि भाजपा (BJP) आमदार गिरीश महाजनांनी (Girish Mahajan) दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना काय मिळतं हा खडसे आणि राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. एकनाथ खडसे यांनी आमचा पक्ष सोडला आहे आणि आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पक्ष सोडून कुणी जाणार नाही, जे हौशे गवशे आहेत तेच जातील, असा टोलाही गिरीश महाजनांनी खडसेंना लगावला आहे. कोणत्याही नगरसेवकाने, जिल्हा परिषद सदस्याने राजीनामा दिलेला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे. केळी पीक नुकसानभरपाईकरिता लावलेले निकष आणि येणारे संभाव्य धोके यांच्यापासून शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही. ते त्वरित बदलावे, अशी मागणीही माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER