निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीमध्ये परतण्यास उत्सुक – नवाब मलिक

Nawab Malik

मुंबई: राष्ट्रवादीचे (NCP) 12 आमदार भाजपात (BJP) जाण्याची चर्चा ही अफवा असून कोणी तरी मुद्दाम अशी अफवा पसरवण्याचं काम करत आहेत असा खुलासा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक  (Nawab Malik) यांनी केला आहे.

एवढेच नाही तर,निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीमध्ये परतण्यास उत्सुक असल्याचे मलिक यांनी सांगितले आहे. मात्र, यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याविषयी लवकरच निर्णय घेऊन घोषणा करण्यात येईल” अशी माहिती नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन दिली.

“काही जण राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या अफवा पसरवत आहेत. हे वृत्त निराधार आणि कपोलकल्पित आहे असे स्पष्टीकरण नवाब मलिक यांनी दिले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनीही भाजपाचे काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचे विधान केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER