आमदारांचा निधी ३ कोटींवरून ४ कोटी; अजित पवारांची घोषणा

MLA's fund from Rs 3 crore to Rs 4 crore; Ajit Pawar's announcement

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात संसर्ग कमी आढळल्यास कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर आमदारांच्या पगारात ३० टक्के कपात करण्यात आली होती. मात्र, ही कपात रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही घोषणा करण्यात आली. आमदारांचा निधीही ३ कोटींवरून ४ कोटी करण्यात आला आहे.

राज्यात गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड होता. लॉकडाउनमुळे सर्व आर्थिक व्यवहार थांबले. शिवाय राज्य खासदार फंडही २ वर्षांसाठी स्थगित केला होता. महाराष्ट्रातील सरकारला करातून मिळणारे उत्पन्नही थांबले होते. सरकारने खासदारांच्या वेतनात ३० टक्के कपात केली होती. तसेच आमदारांच्या वेतनातही ३० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता. एप्रिल २०२० ते एप्रिल २०२१ अशी एका वर्षासाठी कपात लागू करण्यात आली होती.

वेतन पूर्ववत करण्याची घोषणा

कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे. अनलॉकमुळे राज्याच्या तिजोरीत बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अजित पवार यांनी बुधवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावेळी त्यांनी येत्या १ एप्रिलपासून आमदारांचे वेतन पूर्ववत करण्याची घोषणा केली. त्याशिवाय आमदारांचा निधी ही ३ कोटींवरून ४ कोटी करण्यात आला आहे.

राज्यातील प्रत्येक आमदारांचा पगार वेगवेगळा असतो. महाराष्ट्रात आमदारांचा पगार ३२ हजारांपासून २ लाख रुपये इतका आहे. यातून व्यवसाय कर आणि आयकर कापून घेतला जातो. नंतरची उर्वरित रक्कम आमदारांना दिली जाते. आमदारांचे उत्पन्न वेगवेगळे असल्याने त्यांना आयकराची रक्कम ही वेगवेगळी असते. पगारात कपात केल्यानंतर त्यांना दर महिना ३० टक्के कपात करून काही ठराविक रक्कम दिली जात होती. मात्र, आता वेतन पूर्ववत करण्यात आली आहे.

आमदारांना २० कोटी निधी

दरम्यान, राज्यातील आमदारांना मतदारसंघातील विकासकामासाठी शासनाकडून २ कोटींचा निधी दिला जात होता. गेल्यावर्षी यात ३ कोटी करण्यात आला होता. यात पुन्हा वाढकरून ३ कोटींवरून ४ कोटी करण्यात आला आहे. त्यामुळे ५ वर्षात आमदारांना २० कोटी निधी मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER