विधानपरिषदेसाठी सरकारकडून येणारी आमदारांची नावं बाजूला ठेवली जाणार – हसन मुश्रीफ

Hasan Mushrif.jpg

कोल्हापूर : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची सरकारकडून येणारी नावं बाजूला ठेवली जाणार असल्याचा मोठा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केला आहे. माझं आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे. राज्यपालांशी त्यांनी चर्चा केली आहे. राज्य सरकारकडून आलेली यादी बाजूला काढून ठेवण्याचं ठरलेलं असल्याचं चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) सांगितलं, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

आपले कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याचे माजी मंत्री विनय कोरे (Vinay Kore) यांच्या मातोश्री यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. त्यांचं सांत्वन करण्यासाठी भय्यासाहेब माने, जिल्हा बँकेचे युवराज पाटील गेले होते. सांत्वन केल्याच्या काही मिनिटांतच चंद्रकांत पाटलांचं आगमन झालं. विनय कोरे आणि चंद्रकांत पाटलांची सांत्वनापर चर्चा झाल्यानंतर त्या दिवशी विधान परिषदेची यादी राज्यपालांकडे जाणार आहे, अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीवर चर्चा झाल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, माझं आणि देवेंद्रजींचं बोलणं झालेलं आहे. राज्यपालांशी त्यांची चर्चा झालेली आहे. ही आलेली यादी बाजूला काढून ठेवण्याचं ठरलेलं आहे, असं वक्तव्य ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.

विनय कोरे यांच्या मातोश्रीच्या निधनानंतर सांत्वनासाठी गेल्यानंतर चंद्रकांतदादांनी हे वक्तव्य केल आहे. सांत्वनानंतर राज्यपाल नियुक्त आमदार निवडीवर चर्चा सुरू झाली तेव्हा दादा म्हणाले, माझं आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालं आहे. त्यांचं आणि राज्यपालांचे बोलणं झालंय. सरकारकडून येणारी नावं बाजूला ठेवली जाणार आहेत. राज्यपालांना त्यांचे अधिकार आहेत, असं वक्तव्य करून दादांनी राज्यपाल आणि फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं आहे. तांत्रिक अडथळे आणून निवडीबद्दल आक्षेप घेण्यात आला तर आम्ही न्यायालयात जाण्याबाबत निर्णय घेऊ, असंही मुश्रीफांनी स्पष्ट के. हे सगळं असंवैधानिक आहे. राज्यपालांवर आतापर्यंत अनेक आरोप झाले आहे, असंही ग्रामविकास मंत्री मुश्रीफांनी यावेळी नमूद केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER