आ. योगेश कदम यांनी दिला कोरोना प्रतिबंधक साहित्यासाठी १६ लाखांचा निधी

Yogesh Kadam

रत्नागिरी/प्रतिनिधी :- खेड, दापोली, मंडणगड या तिन्ही तालुक्यातील आरोग्य केंद्रे व ग्रामपंचायतीना आमदार योगेश कदम यांनी कोरोना प्रतिबंधक साहित्य खरेदीसाठी १६ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीच्या कर्मचारी वर्गाला विविध प्रकारचे साहित्य या निधीतून पुरविले जाणार आहे. या निधीतून दापोली तालुक्यातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना, ग्रामकृती दल सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविकांना १५ हजार मास्क, मंडणगड तालुक्यासाठी ७ हजार ५०० मास्क व खेड तालुक्यासाठी ७५०० मास्क देण्यात आले.

मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना २०० पीपीई किट पुरविली असून, यामध्ये दापोलीत १००, तर मंडणगड व खेड तालुक्यातील आरोग्य केंद्रांना प्रत्येकी ५० पीपीई किटचा समावेश आहे. जंतूनाशक फवारणी करण्यासाठी मतदार संघातील ग्रामपंचायत कार्यालये व आरोग्य केंद्राना ५ लिटरचे ११५ कॅन देण्यात आले. दापोलीत ५५, खेड व मंडणगड तालुक्यासाठी प्रत्येकी ३० कॅन पुरवले आहेत, सॅनिटायझरच्या १०० मिलीच्या १ हजार ५०० बाटल्या दापोली तालुक्यातील आरोग्य केंद्रांना, तर प्रत्येकी ७५० बाटल्या खेड व मंडणगड तालुक्यांना दिल्या. याव्यतिरिक्त दापोलीसाठी ८ थर्मल स्कॅनर गन्स आणि मंडणगड, खेडसाठी प्रत्येकी ६ गन्स दिले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER