जतचे आमदार विक्रम सावंत कोरोना पॉझिटिव्ह

Vikram Sawant - Corona Positive

सांगली : जतचे आमदार विक्रम सावंत (Vikram Sawant) कोरोना (Corona) पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक आटोपून बाहेर पडतानाच त्यांचा चाचणी अहवाल आला. दरम्यान जिल्ह्यात शुक्रवारी उच्चांकी १ हजार ३७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. एका दिवसात पहिल्यांदाच रुग्णसंख्येने एक हजाराचा आकडा पार केला. शुक्रवारी जिल्ह्यात ३१ आणि परजिल्ह्यातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. उपचाराखालील ७६५ व्यक्ती अतिदक्षता विभागात आहेत.

जिल्ह्यात शुक्रवारअखेर एकूण पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या १५ हजार ६५० झाली आहे. शुक्रवारअखेर ८ हजार ३८६ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. सध्या ६ हजार ६६७ व्यक्ती उपचाराखाली आहेत. त्यापैकी ७६५ व्यक्तींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यातील ६१५ व्यक्ती ऑक्सिजनवर, १०१ व्यक्ती नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर, ९ व्यक्ती हायफ्लो नेझल ऑक्सिजनवर, ४० व्यक्ती इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर आहेत. उपचाराखालील ४ हजार २४ व्यक्ती होम आयसोलेशन आहेत. शुक्रवारअखेर एकूण मृत व्यक्तींची संख्या ५९७ झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. शुक्रवारी सांगली महापालिका क्षेत्रातील ४९० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. यामध्ये सांगलीतील ३२५, मिरजेतील १६५ व्यक्तींचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER