आमदार सुमनताई आर. आर. पाटील कोरोना पॉझिटिव्ह

MLA Sumantai R. R. Patil Corona Positive

सांगली : माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील (R. R Patil) यांच्या पत्नी सांगली जिल्ह्यातील तासगाव विधानसभा मतदार संघाच्या आमदार सुमन पाटील ( Sumantai Patil ) यांना करोनाचा संसर्ग (Corona) झाला आहे. शनिवारी त्यांचा स्वॅब तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मुलगा रोहित पाटील आणि दीर सुरेश पाटील यांचे अहवाल दोन दिवसांपूर्वीच पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर सांगलीत उपचार सुरू होते. शनिवारी तिघांनाही उपचारासाठी पुण्याला हलवले आहे. आमदार सुमन पाटील यांनी तिघांचीही प्रकृती चांगली आहे. तिघांची प्रकृती ठीक असून, गेल्या दोन दिवसात संपर्कात आलेल्या लोकांनी वैद्यकीय तपासणी करून दक्षता घ्यावी, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.

दरम्यान खानापूर मतदार संघाचे आमदार अनिल बाबर, जतचे आमदार विक्रम सावंत तसेच माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांचा करोना चाचणी अहवालही शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यांना घरीच अलगीकरण करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. करोना बाधित लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात नागरिकांनी संसर्गाची धास्ती घेतली आहे.

ही बातमी पण वाचा : सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांना कोरोनाची लागण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER