शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा ‘बाहुबली’ अवतार ;रस्त्यात पडलेले झाड बाजूला करुन त्यांनी वाट मोकळी करुन दिली

MLA Sanjay Gaikwad

मुंबई :- आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे मागील काही दिवसापासून संपूर्ण राज्यात चर्चेत आलेले आहे. नुकतंच, बुलडाणा मतदारसंघात वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर पडलेले झाड आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत रस्त्याच्या बाजूला केले. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झाला आहे.

शुक्रवार 28 मेच्या रात्री बुलडाणा मतदारसंघातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला होता. याची माहिती आमदार गायकवाड यांना समजल्यानंतर ते 29 मे रोजी स्वतःचा वाढदिवस असतानाही नुकसानाच्या पाहणीसाठी गेले. सकाळी गुळभेली ते राहेरा मार्गाने जात असताना एक झाड त्यांना रस्त्यात पडलेले दिसले. आमदार गायकवाड यांचा झाड बाजूला करतानाचा व्हिडीओ त्यांनी स्वतः फेसबुकवर शेअर केला असून सोशल मीडियावरही खूप वायरल होत आहे.

दरम्यान नागरिकांनी रोग प्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी जास्तीत जास्त मांसाहार सेवन करावा, असे गायकवाड म्हणाले होते. मात्र या वक्तव्यावरुन ज्यांच्या भावना दुखावल्या असतील अशी दिलगिरीही गायकवाडांनी व्यक्त केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button