ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्यासाठी आमदार ऋतुराज पाटलांची विशेष मोहिम

KhashabaJadhav & Ruturaj Patil

कोल्हापूर : कुस्ती म्हणजे कोल्हापूर आणि कोल्हापूर म्हणजे कुस्ती. या परंपरेवर जागतिक पातळीवर ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांनी शिक्कामोर्तब केले. खाशाबानी कुस्तीतून ब्रँड कोल्हापूर जगात पोहोचवला. खाशाबांचे नाव आजही लोकांच्या मनामनात आहे. पण या कोल्हापुरी कर्तृत्वाचा सरकारी पातळीवर योग्य सन्मान झालेला नाही.

त्यामुळेच, त्यांचा यावर्षी मरणोत्तर “पद्मभूषण” पुरस्काराने सन्मान व्हावा, अशी संपूर्ण कोल्हापूरकर आणि कुस्तीप्रेमींची भावना आहे. महाराष्ट्र सरकार आज केंद्राकडे नावे पाठवणार आहे. समस्त कोल्हापूरकरांच्या वतीने माझी राज्य व केंद्र सरकारला विनंती आहे की त्यांनी खाशाबा जाधव यांचा यथोचित गौरव करावा. खाशाबांच्यासाठी आपणही सोशल मीडियावर #PadmaForKhashabaJadhav हा टॅग वापरून आपल्या भावना ट्विट करूयात. असे आवाहन आ. ऋतुराज पाटील यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER