नवनीत राणा पाठोपाठ रवी राणाही कोरोनाबाधित

Ravi Rana and Wife

अमरावती : गुरुवारी सकाळी खासदार नवनीत राणांचा (Navnit Rana) कोरोना (Corona) चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आला होता आणि आता‌ नुकत्याच हाती आलेल्या माहीतीनुसार आमदार रवी राणा (Ravi Rana) यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राणा कुटुंबातील एकूण दहा जणांना आधीच करोनाची लागण झाली असून कुटुंबातील करोनाबाधितांची संख्या १२ इतकी आहे. राणा कुटुंबावर सध्या नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, रवी राणा यांनाही अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांचीही आज करोनाची चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आमदार रवी राणा यांचे वडील, म्हणजेच नवनीत कौर राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट २ ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर राणा दाम्पत्य, त्यांची मुले आणि कुटुंबातील इतर सदस्य, कार्यकर्ते अशा जवळपास ५० ते ६० जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली.

आमदार रवी राणा यांच्या वडिलांसोबतच आई, मुलगा, मुलगी, बहिण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या अशा एकूण बारा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं. रवी राणा यांच्या आई-वडिलांवर नागपूरच्या एका रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथे नवनीत राणा आणि रवी राणादेखील गेले होते. सासू-सासरे आणि मुलांच्या संपर्कात आल्यामुळे नवनीत राणा आणि रवी राणा यांना कोरोनाची लागण झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER