आमदार रत्नाकर गुट्टेंचे अजितदादा, थोरात, अशोक चव्हाणांचा आव्हान ! तर पालकमंत्री धनंजय मुंडेंना इशारा

Ratnakar Gutte

मुंबई :- गंगाखेड शुगर साखर कारखान्याला आकसापोटी परवानगी दिली नाही असा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचा थेट चॅलेंज दिलं आहे. तर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना निर्वाणीचा इशारा दिला.

गंगाखेड शुगरला ज्या अटी लावल्या आहेत, त्या तुमच्या कारखान्याला का नाहीत? असा सवाल गुट्टे यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर सरकारने लावलेल्या अटीनुसार राज्यातील एकही कारखाना सुरु होणार नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना चॅलेंज आहे. त्यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावं , असे आव्हानच गुट्टे यांनी दिले आहे.

गंगाखेड शुगरने सरकारने घालून दिलेल्या अटी पूर्ण केल्या आहेत. एफआरपीनुसार शेतकऱ्यांना पेमेंट देण्यात आलं. कारखान्याला ऊस घातल्यानंतर 15 दिवसांत शेतकऱ्यांना त्यांचे पैसे दिले. तरीही राजकीय आकसापोटीच गंगाखेड शुगरला गाळपास परवानगी दिली नाही, असा आरोप आमदार गुट्टे यांनी केला आहे.

गंगाखेड शुगर सुरु झाला नाही तर परिसरातील 7 लाख टन ऊश गाळपाअभावी उभा राहिल, अशी भीती गुट्टे यांनी व्यक्त केली आहे. अशावेळी गुट्टे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना या प्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. पवार साहेब, आपण देशाचे नेते आहात. आपल्या हातानेच पहिली मोळी टाकली आहे. यंदा कारखाना सुरु करुन आपला वाढदिवस साजरा करा, अशी विनंती गुट्टे यांनी पवारांकडे केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER